आवाहन

रसयात्रेच्या या प्रवाहात आपले स्वागत आहे.

आपण लेखक असाल, कवी असाल, विचारवंत असाल की कोणीही असाल ! आपले स्वागत आहे. आपले लेखन या यात्रेमध्ये सामील करू इच्छित असाल तर आपले स्वागतच आहे. हे लेखन कोणत्याही विषयावर असले तरी हरकत नाही. फक्त अट एकच – कोणावरही वैयक्तिक टीका,आक्षेप नसावे. कुणाचे विनाकारण चारित्र्यहनन नसावे. लेखन सभ्यतेच्या आणि सुसंस्कृततेच्या निकषावर खरे उतरणारे असावे. इतिहासाचा विपर्यास करणारे नसावे. कोणाचेही उचलून, ढापून लिहिलेलं नसावे.

थोडक्यात सर्व सामान्य रसिकांना वाचकांना आवडेल त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना विचार करायला प्रवृत्त करेल, नवी दिशा आणि बळ देईल असे लेखन स्वीकारले जाईल. आपले लेखन युनिकोड देवनागरी फॉन्ट मध्ये टाईप करून वर्ड फाईल मध्ये आपला नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबरसह इन्फो ऍट रसयात्रा डॉट कॉम ( info [at] rasyatra.com ) या इमेल पत्त्यावर पाठवावे. आपले लेखन योग्य असल्यास प्रसिद्ध केले जाईल आणि त्यानुसार आपणास कळवले जाईल.

चला तर मग या रसयात्रेत लेखक म्हणून सामिल व्हा !!

धन्यवाद

रसयात्रा संपादक मंडळ
रसयात्रा.कॉम

Skip to content