भोंडला भुलाबाई (परिचय)

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्रात खेळला जाणारा सण, हादगा उर्फ भोंडला नावाने ओळखला जातो. हातगा म्हणजे हस्तग्रह. हस्त नक्षत्राची पूजा शहरी भागातून “भोंडला” आणि ग्रामीण भागातून “हादगा” या नावाने महाराष्ट्रात ओळखली जाते.

भोंडला

कृषीप्रधान भारतीय समाजामधे पावसाळी नक्षत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही, हस्त नक्षत्र फार महत्वाचे मानले जाते. हस्ताच्या पावसाअभावी पीक करपून (बांड) जाण्याची शक्यता असते. हस्ताचा पाऊस चांगला पडला तर सर्वत्र सधनता येते. सुख-समाधानाने मानवी जीवनात, तनामनात नवा उत्साह निर्माण होतो. हे सर्व ज्याच्यामुळे शक्य होते त्या हस्त नक्षत्राचा मान म्हणून त्याची पूजा केली जाते. अभ्यासकांच्या मते हा एक पर्जन्य विधी आहे.

भोंडला कधी साजरा केला जातो?
भोंडला आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून (घटस्थापना) ते आश्विन पौर्णिमेपर्यंत (कोजागिरी) साजरा केला जातो.

भोंडल्याची पूजा

पाटावर रांगोळीने अथवा खडूने हत्ती काढून त्या हत्तीची पूजा बांधायची हा या हादगा अथवा भोंडला उत्सवाचा हेतू असतो. ही पूजा करायचा मान असतो तो पोरसवदा अर्थात परकरी पोरी बाळींचा. दररोज सायंकाळी पाटावर काढलेल्या हत्ती भोवती फेर धरून मुली निरनिराळी गाणी म्हणतात. या गाण्यांमधे जुन्याकाळच्या सासर माहेरच्या गोष्टी असतात, भन्नाट आणि वैचित्र्यपूर्ण कल्पनांच्या उड्या असतात, तर कधी प्राचीन काळचा इतिहास असतो. वरकरणी चित्रविचित्र तर कधी कधी निरर्थक वाटणार्‍या शब्दांमधून स्त्रियांच्या कथांचे/व्यथांचे बोलके रुप नजरेसमोर उभे रहाते.

मुली अहमहमिकेने एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्षेने, चढाओढीने निरनिराळी गाणी म्हणत रहातात. अर्थात, त्यांना सहाय्य असते ते वडीलाधार्‍या बायकांचे. त्यांच्याकडून त्या निरनिराळी गाणी शिकतात. याचबरोबर रोज वेगवेगळ्या ओळखता न येणार्‍या चविष्ट पदार्थांच्या खिरापती तयार केल्या जातात.

भुलाबाई

पश्चिम महाराष्ट्रात आश्विन महिन्यात जशी हादग्याची पूजा बांधली जाते, त्याप्रमाणे विदर्भ खानदेशात भाद्रपद पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत भुलाबाईजी पूजा मांडली जाते. भुलाबाई म्हणजे पार्वती. भुलोबा म्हणजे शंभू महादेव (शंकर). सर्व जगताचे तारणहार म्हणून त्यांची पूजा बांधायची हा या उत्सवाचा मुख्य उद्देश. घरातील कोनाड्यात आरास करुन मखरात भुलोबा, भुलाबाई, बाळ यांची मातीची चित्रे मांडतात. चित्रांची फळाफुलांनी पूजा करतात. कोजागिरी पौर्णिमेला त्यांचे विसर्जन केले जाते.

हादग्याच्या गाण्यांप्रमाणेच पोरीबाळी भुलाबाईच्या गाण्यांनी घरदार दणाणून टाकतात. खेळून दमल्यानंतर फराळ केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांच्या खिरापती तयार केल्या जातात.

असा हा मराठी मुलखात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जाणारा पारंपारीक सण भोंडला-भुलाबाई.

भोंडला भुलाबाई – पारंपारीक भोंडला भुलाबाई गाण्यांचा खजिना

आपे दूध तापे

भोंडला भुलाबाई – २२ आपे दूध तापे

आपे दूध तापे त्यावर पिवळी सायलेकी भुलाबाई तोडे लेवून जायकशी…

आड बाई आडोनी

भोंडला भुलाबाई – २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई

कारलीचं बी पेर ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा कारल्याचं बी…

येथून दाणा पेरीत जाऊ

भोंडला भुलाबाई – २० येथून दाणा पेरीत जाऊ

येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या…

या भुलाबाई आमुच्या आळी

भोंडला भुलाबाई – १९ या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात निळ्ळी चोळीनिळ्या चोळीवर मोर काढलानिळ्ळ्या…

अजून वाचा
Skip to content