संग्राहक

संग्राहक

बडबड गीत १८

आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडु तेल पाडु तेलंगाचे एकच पान धर ग बेबी एकच कान चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ हंडा पाणी गडप !

बडबड गीत १७

चांदोबा चांदोबा भागलास का ? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तुप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा गेला ऊपाशी

भोंडला भुलाबाई ४ – नंदा भावजया दोघीजणी

ऐलमा पैलमा, नंदा भावजया दोघीजणी

नंदा भावजया दोघीजणीखेळत होत्या गाईच्या गोठ्यातखेळता खेळता झगडा झालाभावजयीवर डाव आलारुसून बसली गाईच्या गोठ्यातसासूरवासी सून रुसून बसली कैसीयादवराया राणी रुसून बसली कैसी सासू गेली समजावयालाचल चल मुली आपुल्या घरालानिम्मा संसार देते तुजलानिम्मा संसार नक्को मजलामी नाही यायची तुमच्या घरालासासूरवासी सून…

बडबड गीत १२

आमची मिनी घुसळते पाणी म्हणते काढीन यातुन लोणी लोण्याची करीन छान छान भजी गोष्टी सांगायला येतील आजी खातील मऊ लोण्याची भजी म्हणतील गुणाची मिनी माझी

बडबड गीत ११

पोळ्या बाई पोळ्या पुरणाच्या पोळ्या एक पोळी करपली दुधासंगे ओरपली दुध लागल कडु बाळाला आल रडु बाळ गेला झोपी त्याला घालु टोपी

भोंडला भुलाबाई ३ – एक लिंबु झेलू बाई

आड बाई आडोनी

एक लिंबु झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचा लिंबाचा पाणवठा माळ घाली हणमंता हणमंताची निळ्ळी घोडी येता जाता कमळं…

Skip to content