Category बडबड गाणी

बडबड गीत २१

छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान इवलीशी जिवणी नी इवलेशे दात चुटू चुटू खाते कशी दूध नी भात इवले इवले डोळे नी इवले इवले कान छान छान छान … इवल्याशा पायामधे इवलासा चेंडू फेकिता मी घ्याया धावे…

बडबड गीत २०

एक होती परी तिला सापडली दोरी दोरी होती लांब जवळ होता खांब दोरी बांधली खांबाला लागली वर वर चढायला दोरी तुटली कचकन परी पडली धपकन

बडबड गीत १८

आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडु तेल पाडु तेलंगाचे एकच पान धर ग बेबी एकच कान चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ हंडा पाणी गडप !

बडबड गीत १७

चांदोबा चांदोबा भागलास का ? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तुप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा गेला ऊपाशी

बडबड गीत १२

आमची मिनी घुसळते पाणी म्हणते काढीन यातुन लोणी लोण्याची करीन छान छान भजी गोष्टी सांगायला येतील आजी खातील मऊ लोण्याची भजी म्हणतील गुणाची मिनी माझी

बडबड गीत ११

पोळ्या बाई पोळ्या पुरणाच्या पोळ्या एक पोळी करपली दुधासंगे ओरपली दुध लागल कडु बाळाला आल रडु बाळ गेला झोपी त्याला घालु टोपी

Skip to content