आश्विन महिन्यात हस्त नक्षत्रात खेळला जाणारा सण, हादगा उर्फ भोंडला नावाने ओळखला जातो. हातगा म्हणजे हस्तग्रह. हस्त नक्षत्राची पूजा शहरी भागातून “भोंडला” आणि ग्रामीण भागातून “हादगा” या नावाने महाराष्ट्रात ओळखली जाते.
रसयात्रेतर्फे भोंडला भुलाबाईमधील निवडक गीतांचे आभासी व्यक्तीरेखांच्या सहाय्याने चित्रीकरण करुन सर्वांपर्यंत ही गाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.