कंटाळा

नेहमीप्रमाणे न चुकता पहाटे साडेपाच वाजता गजराने ठणाणा केला. झालं रोजचं रुटीन सुरु असं म्हणत, मनातल्या मनात कुरकुरतच जान्हवीने गजर बंद केला. कधी कधी या घड्याळाचा अस्सा राग येतो की कुठंतरी सांदीकोपर्यात दडवून ठेवावं असं वाटतं. एखाद दिवशी साखरझोपेच्या वेळेसच…