भोंडला भुलाबाई ४ – नंदा भावजया दोघीजणी

नंदा भावजया दोघीजणीखेळत होत्या गाईच्या गोठ्यातखेळता खेळता झगडा झालाभावजयीवर डाव आलारुसून बसली गाईच्या गोठ्यातसासूरवासी सून रुसून बसली कैसीयादवराया राणी रुसून बसली कैसी सासू गेली समजावयालाचल चल मुली आपुल्या घरालानिम्मा संसार देते तुजलानिम्मा संसार नक्को मजलामी नाही यायची तुमच्या घरालासासूरवासी सून…