बडबड गीत ६

सोशल मिडीयावर शेअर करा

एक दोन तीन बाहुलीचे लगीन

वरातीचा बॅंजो वाजे झिंक चक झिंक

तीन चार पाच सार्‍यांचा नाच

सार्‍यांनी घातला फुलांचा साज

पाच सहा सात नाच चाले जोरात

दवाचं घुंगरु वार्‍याची साथ

सात आठ नऊ घरी नका जाऊ

सर्व जण लग्नाचे लाडु खाऊन जाऊ

आठ नऊ दहा सगळे जमले पहा

वरातीचा थाट माट दिसतो अहा !


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content