बडबड गीत ७

सोशल मिडीयावर शेअर करा

सहज गेलो गावाला

माझ्या कोंबडीला कुणी मारले

माझ्या कोंबडीचे पाय

जशी दुधावरची साय

माझ्या कोंबडीचे पोट

जशी विहीरीची मोट

माझ्या कोंबडीचे पंख

जसे समुद्रातले शंख

माझ्या कोंबडीचे गाल

जसा खेळायचा फुटबाँल

माझ्या कोंबडीचे डोळे

जशे लोण्याचे गोळे


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content