बडबड गीत ८

सोशल मिडीयावर शेअर करा

आकाशीच्या चंद्रा मला हसायला शिकव

गोड गोड हसायला शिकव

अरे अरे माश्या मला पोहायला शिकव

दूर दूर मला जायला शिकव

अरे अरे वार्‍या मला नाचायला शिकव

झिम्मा फुगडी धांगडधिंगा शिकव

अग अग मैने मला गायला शिकव

गाण्याची तान मला घ्यायला शिकव

अरे अरे राघु मला बोलायला शिकव

फुलासारख छान छान डोलायला शिकव


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content