कसोटि लागता रंग उतरले होते
वाढत्या स्नेहात रंग कळले होते
ऐकली कर्मकहाणी ज्यांची सदैव
बोलता मी ते कसे पांगले होते
कसा कोकिळ गातो या अशा अवेळी
की त्याचे ही कुणी दुरावले होते
छेडीता लकेर का डोळ्यात पाणी
की आठवांना मी दुखावले होते
ठेचकाळुनी तोल जाता अवचित तो
सावरि धावले ते सुखावले होते
’बशर’ छेडीलेस तु सूर भैरवीचे
रंग तेव्हा मैफिलीत भरले होते
– बशर (उपेंद्र)