बडबड गीत २१

सोशल मिडीयावर शेअर करा

छान छान छान

मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान

इवलीशी जिवणी नी इवलेशे दात

चुटू चुटू खाते कशी दूध नी भात

इवले इवले डोळे नी इवले इवले कान

छान छान छान …

इवल्याशा पायामधे इवलासा चेंडू

फेकिता मी घ्याया धावे दूडू दूडू

इवल्याशा शेपटीची झाली कमान

छान छान छान …

आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ

बाळाची मजा दुरुनीच पाहू

आईशी बाळ खेळे विसरुनी भान

छान छान छान …


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content