सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
तिथं आमच्या वन्सं खेळत होत्या
वन्सं वन्सं मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस
पूस जा आपल्या दिराला
सोन्याचा चेंडू बाई मोत्याचा दांडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस
पूस जा आपल्या जावेला
सोन्याची रवी बाई रुप्याचा डेरा
तिचं आमच्या जाऊबाई ताक करित होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस
पूस जा आपल्या सासर्याला
सोन्याची सहाण बाई रुप्याचं खोड
तिथं आमचे मामंजी पूजा करीत होते
मामंजी मामंजी मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतीस
पूस जा आपल्या सासूला
सोन्याचा करंड बाई रुप्याचा आरसा
तिथं आमच्या सासुबाई कुंकू लावीत होत्या
सासुबाई सासूबाई मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतीस
पूस जा आपल्या नवऱ्याला
रुप्याचा पलंग बाई रेशमाची गादी
तिथं आमचे पती बाई निजले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी
जाऊ द्या राणी माहेरा
हे आपण वाचलेत का?
आला चेंडू गेला चेंड...
आपे दूध तापे त्यावर...
बाजारातून आणला एकच ...
आधी नमुया श्री गणरा...
अवठ बाई कवठ गकवठातु...
नदीच्या पल्ल्याड को...
एवढसं तांदूळ बाई नख...
अळकीत जाऊ का खि...
एक लिंबु झेलू बाई द...
अक्कण माती चिक्कण म...
ऐलमा पैलमा गणेश देव...
श्रीकांता कमलाकांता...