भोंडला भुलाबाई १३ – काळी चंद्रकळा नेसू मी कशी

काळी चंद्रकळा नेसू मी कशीगळ्यात हार बाई वाकू कशीपायात पैंजण चालू मी कशीबाहेर मामंजी बोलू कशीदमडीचं तेल मी आणू कशीदमडीचं तेल बाई आणलंसासू बाईंच न्हाणं झालंवन्सबाईंची वेणी झालीमामंजींची दाढी झालीउरलेलं तेल झाकून ठेवलंलांडोरीचा पाय लागलावेशीपातूर ओघळ गेलात्यातून हत्ती वाहून गेला