भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

सोशल मिडीयावर शेअर करा

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होता दाना
भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा नाना

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होती सुई
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा सई

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होता बदामा
भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सुदामा

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होत्या खारका
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा द्वारका

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होता गिलास
भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा विलास

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होती टिपरी
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा झिपरी

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होती बशी
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा काशी

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होता झोपाळा
भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा गोपाळा

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होत्या बिट्ट्या
भुलोजीला मुलगा झाला गावोगाव चिठ्ठ्या

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
खिळकीत होता पाटा
भुलोजीला मुलगा झाला साखरपान वाटा

विहीर बाई विहीर अशी कशी विहीर
सोन्याच्या पायर्‍या रुप्याचा दोर
आज भुलाबाई घरी नाई
कथा कोणी करावी
करावी तर करावी शंकरानं करावी
पारबतीनं ऐकावी
बाना बाई बाना साखरेचा बाना
आमचं गानं संपलं खिरापत आना

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content