भोंडला भुलाबाई १० – श्रीकांता कमलाकांता

सोशल मिडीयावर शेअर करा

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडीयाच्या बायकोनं केल्या होत्या शेवया
आळ्या आळ्या म्हणून त्यानं टाकून दिल्या
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडियाच्या बायकोनं केले होते लाडू
चेंडू चेंडू म्हणून त्यानं खेळाया घेतले
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडीयाच्या बायकोनं केल्या होत्या करंज्या
नाव नाव म्हणून त्यानं पाण्यात सोडल्या
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडियाच्या बायकोनं केल्या होत्या चकल्या
बांगड्या बांगड्या म्हणून त्यानं हातात घातल्या
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडीयाची बायको झोपली होती पलंगावर
मेली मेली म्हणून त्यानं जाळून टाकली सरणावर
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १७ - सा बाई सूं
सा बाई सूं सा बाई स...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content