बडबड गीत २१
छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान इवलीशी जिवणी नी इवलेशे दात चुटू चुटू खाते कशी दूध नी भात इवले इवले डोळे नी इवले इवले कान छान छान छान … इवल्याशा पायामधे इवलासा चेंडू फेकिता मी घ्याया धावे…
बडबड गीत २०
एक होती परी तिला सापडली दोरी दोरी होती लांब जवळ होता खांब दोरी बांधली खांबाला लागली वर वर चढायला दोरी तुटली कचकन परी पडली धपकन
बडबड गीत १९
खारुताई भित्री दिवाळीच्या रात्री ठुमकत चालली ऊठुन रात्री वरतुन पडला कागदी बाण खारुताईची उडाली दाणादाण
बडबड गीत १८
आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडु तेल पाडु तेलंगाचे एकच पान धर ग बेबी एकच कान चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ हंडा पाणी गडप !
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भागलास का ? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तुप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा गेला ऊपाशी
भोंडला भुलाबाई – २२ आपे दूध तापे
आपे दूध तापे त्यावर पिवळी सायलेकी भुलाबाई तोडे लेवून जायकशी लेवू दादा घरी नणंदा जावाकरतील माझा हेवाहेवा परोपरीनणंदा घरोघरीदु:ख देती भारीनणंदेचा बैल डुलत येईलसोन्याचं कारलं झेलत येईलएक टिपरी उभे राहू अस्मानीचा गड पाहूगडावर गड माहूर गड तिथला सोनार कारागीरत्यानं आणला…
भोंडला भुलाबाई – २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा कारल्याचं बी पेरलं हो सासूबाईआता तरी धाडा ना माहेरा कारल्याला पाणी घाल ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला पाणी घातलं हो…
भोंडला भुलाबाई – २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या तुमच्या भारी येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका तोरड्या तुमच्या भारी येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच…
भोंडला भुलाबाई – १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात निळ्ळी चोळीनिळ्या चोळीवर मोर काढलानिळ्ळ्या मोरावर सांडला गुलालभुलोजी दल्लाल घरी नाही, घरी नाही या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात लाललाल चोळीलाललाल चोळीवर बसला मोरबसल्या मोरावर सांडलं…
भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता दानाभुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा नाना अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होती सुईभुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा सई अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता…
रंग
कसोटि लागता रंग उतरले होतेवाढत्या स्नेहात रंग कळले होते ऐकली कर्मकहाणी ज्यांची सदैवबोलता मी ते कसे पांगले होते कसा कोकिळ गातो या अशा अवेळीकी त्याचे ही कुणी दुरावले होते छेडीता…
शल्य
हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमकेआसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावतीचंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावतीबंधण्या विहंग पिंजरी पाश…