हे गाणे श्राव्यरुपात (ऑडीओ) ऐकण्यासाठी क्लिक करा
हस्त हा दुनियेचा राजा
तयासी नमस्कार माझा
नमस्कारा सरशी वारा
आधी पडल्या मेघ धारा
मागुन पडल्या मुसळधारा
धारा या दुधाच्या दिसती
त्याने ग पिके ही पोसती
हस्ताची मग पाळी आली
म्हणून त्याने गंमत केली
त्याच्या योगे चिखल झाला
त्या बाई चिखलात लावली केळं
एक एक केळं मोठालं
हादग्या देवा वाहीलं
खिरापतीला वाटीलं




