एक लिंबु झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पाणवठा
माळ घाली हणमंता
हणमंताची निळ्ळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळा पाठीमागं लागली राणी
अग अग राणी इथं कुठं पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लाळ बाळू
चिल्लाळ बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिपीनं दूध पाजीलं
परटाच्या घडीनं तोंड पुसीलं
इथं इथं निज रे बाळा
मी तर जाते सोनार वाड्या
सोनारीन बाई सोनार दादा
बाळाच्या बिंदल्या झाल्या का नाय
आज नाय झाल्या उद्या या
(सगळे दागिने गोवून गाणे लांबवावे)
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई - २२ आपे दूध तापे
आपे दूध तापे त्यावर...

