क्रमांक १
आड बाई आडोनी
आडाचं पाणी खारोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती सुपारी
आमचा हादगा दुपारी
आड बाई आडोनी
आडाचं पाणी खारोनी
आडात होता शिंपला
आमचा हादगा संपला
क्रमांक २
आड बाई आडोणी
आडाचं पाणी खारोणी
आडात होता माळी
आमचा हातगा संध्याकाळी
आड बाई आडोणी
आडाचं पाणी खारोणी
आडात पडली सुपारी
आमचा हातगा दुपारी
आड बाई आडोणी
आडाचं पाणी खारोणी
आडात पडली कात्री
आमचा हातगा रात्री
आड बाई आडोणी
आडाचं पाणी खारोणी
आडात पडला शिंपला
आमचा हातगा संपला




