नदीच्या पल्ल्याड कोण पावना आला ग सई आला ग
दिर पावना आला ग सई आला ग
काय काय घिवून आला ग सई आला ग
एकसर घिवून आला ग सई आला ग
एकसर मी लेवायची न्हाय
त्येच्या संगं जायाची न्हाय
चारी दरवाजं झाका ग सई झाका ग
झिपरी कुत्री सोडा ग सई सोडा ग
नदीच्या पल्ल्याड कोण पावना आला ग सई आला ग
सासरा पावना आला ग सई आला ग
काय काय घिवून आला ग सई आला ग
टिक्का घिवून आला ग सई आला ग
टिक्का बिक्का लेवायची न्हाय
त्येंच्या संगं जायाची न्हाय
चारी दरवाजं झाका ग सई झाका ग
झिपरी कुत्री सोडा ग सई सोडा ग
नदीच्या पल्ल्याड कोण पावना आला ग सई आला ग
कारबारी पावना आला ग सई आला ग
काय घिवून आला ग सई आला ग
दुरडी घिवून आला ग सई आला ग
दुरडी मी काय खायाची न्हाय
त्येला रिकामं पाटवायची न्हाय
चारी दरवाजे उघडा ग सई उघडा ग
झिपरी कुत्री बांधा ग सई बांधा ग
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई १७ - सा बाई सूं
सा बाई सूं सा बाई स...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...

