आपे दूध तापे त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई तोडे लेवून जाय
कशी लेवू दादा घरी नणंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा परोपरी
नणंदा घरोघरी
दु:ख देती भारी
नणंदेचा बैल डुलत येईल
सोन्याचं कारलं झेलत येईल
एक टिपरी उभे राहू अस्मानीचा गड पाहू
गडावर गड माहूर गड तिथला सोनार कारागीर
त्यानं आणला साखळजोड
घेता घेता लाजली तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या ठाकूरा भुलाबाई जाते सासूरा
जाते तशी जाऊ द्या तांब्याभर पाण्यानं न्हाऊ द्या
बोटभर मेण लावू द्या कंपाळभर कूंकू लेऊ द्या
जांभळे लुगडे नेसू द्या जांभळी चोळी घालू द्या
मूठभर भात खाऊ द्या जांभळ्या घोड्यावर बसू द्या
जांभळ्या घोड्याचे उडते पाव आऊल पाऊल नागपूर गाव
नागपूर गावचे ठासेठूसे दुरून भुलाबाईचे सासर दिसे
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...