भोंडला भुलाबाई १६ – आधी नमुया श्री गणराया

हे गाणे श्राव्यरुपात (ऑडीओ) ऐकण्यासाठी क्लिक करा

आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडी हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबो थेंबी आल्या लोंबी
पिवळ्या लोंबी आणूया
तांदूळ त्याचे कांडूया
मोदक लाडू बनवूया
गणरायाला अर्पूया