आरडी बाई परडी ग
परडी येवढे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ सासरा
सासर्यानं काय आणिलं
सासर्यानं आणल्या पाटल्या
येत नाही बरोबर
बसत नाही घोड्यावर
आरडी बाई परडी ग
परडी येवढे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ सासू
सासूनं काय आणिलं
सासूनं आणल्या साखळ्या
येत नाही बरोबर
बसत नाही घोड्यावर
आरडी बाई परडी ग
परडी येवढे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ दिर
दिरानं काय आणिलं
दिरानं आणले वाळे
येत नाही बरोबर
बसत नाही घोड्यावर
आरडी बाई परडी ग
परडी येवढे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ नणंद
नणंदेनं काय आणलं ग बाई
नणंदेनं आणले गोट गं
येत नाही बरोबर
बसत नाही घोड्यावर
आरडी बाई परडी ग
परडी येवढे फूल ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ कोण ग
दारी मूळ पति
पतीनं काय आणलं ग बाई
पतीनं आणली नथ
येते तुमच्या बरोबर
बसते तुमच्या घोड्यावर
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड को...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...

