भोंडला भुलाबाई १ – ऐलमा पैलमा

सोशल मिडीयावर शेअर करा

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी

पारवं घुमतं बुरुजावरी

पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे

गुंजावणी डोळ्यांच्या सारवील्या टिक्का

आमच्या गावच्या भुलोजी नायका

एवीन गाय तेवीन गाय

कांडा तीळ बाई तांदुळ कांडा

आमच्या आया तुमच्या आया

खातील काय दुधोंडे

दुधोंड्याची लागली टाळी

आयुष्य देरे बा माळी

माळी गेला शेता भाता

पाऊस पडला येता जाता

पड पड पावसा थेंबोथेंबी

थेंबोथेंबी आळव्या लोंबी

आळव्या लोंबती अंकणा

अंकणा तुझी सात कणसं

भोंडल्या तुझी सोळा वर्ष

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड को...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content