बडबड गीत १५
वाटी बाई वाटी दह्याची वाटी मांजर चाटी घाल रे बंड्या मांजरीच्या पाठी वेताची काठी
बडबड गीत १४
काळा काळा चष्मा दुर करतो ऊष्मा भर दुपारी लावुन बघा वाटते काय गंमत सांगा
बडबड गीत १३
अडगुल मडगुल सोन्याचे कडगुल रुप्याचा वाळा तान्हया बाळा तीट लावा
बडबड गीत १२
आमची मिनी घुसळते पाणी म्हणते काढीन यातुन लोणी लोण्याची करीन छान छान भजी गोष्टी सांगायला येतील आजी खातील मऊ लोण्याची भजी म्हणतील गुणाची मिनी माझी
भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं
सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलागुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलाशेवंतीचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला…
भोंडला भुलाबाई १६ – श्री गणराया
आधी नमुया श्री गणरायामंगलमुर्ती विघ्न हरायामंगलमुर्ती उंदरावरीसत्ता त्याची इंद्रावरीइंद्र हा स्वर्गीचा राजाझुलती हत्तीच्या फौजावरुण चाकर इंद्राचापाऊस पाडी हस्ताचापड पड पावसा थेंबोथेंबीथेंबो थेंबी आल्या लोंबीपिवळ्या लोंबी आणूयातांदूळ त्याचे कांडूयामोदक लाडू बनवूयागणरायाला…
भोंडला भुलाबाई १५ – आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे पाणी खारवणीआडांत होत्या बायकाआंगी टोपी ल्हायकाआंगी टोपी हरवलीहरपा पायी दडपलीसरप म्हणे मी एकुलादारी आंबा पिकुलादारी आंब्याची कोय गआंबा नाचती मोर गरंभा पाही दिवट्याआम्ही लेकी गोमट्यागोमट काजळ लाउंगासासरी…
भोंडला भुलाबाई १४ – आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासरासासर्यानं काय आणिलंसासर्यानं आणल्या पाटल्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी…
भोंडला भुलाबाई १३ – काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू मी कशीगळ्यात हार बाई वाकू कशीपायात पैंजण चालू मी कशीबाहेर मामंजी बोलू कशीदमडीचं तेल मी आणू कशीदमडीचं तेल बाई आणलंसासू बाईंच न्हाणं झालंवन्सबाईंची वेणी झालीमामंजींची दाढी झालीउरलेलं…





















