बडबड गीत ६
एक दोन तीन बाहुलीचे लगीन वरातीचा बॅंजो वाजे झिंक चक झिंक तीन चार पाच सार्यांचा नाच सार्यांनी घातला फुलांचा साज पाच सहा सात नाच चाले जोरात दवाचं घुंगरु वार्याची साथ सात आठ नऊ घरी नका जाऊ सर्व जण लग्नाचे लाडु…
बडबड गीत ५
गोरा गोरा पान छोटा छोटा छान सुपाएवढे कान तो दिसतो किती छान इवले इवले डोळे काळे काळे निळे सोंड पहा याची वाकुडी वळे मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट उंदराची…
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट त्याला बांधला ऊंट पाणी पिऊन पिऊन त्याचे पोट फुगले तट्ट ऊंट झाला पोकाडा दाही अंगी वाकुडा त्यावर बसला वाटाडा थापाडा आणि बाताडा
बडबड गीत ३
डोक्यावरी चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा हातात कमंडलु दिसतो छान नागोबाच्या फण्याने झाकली मान शंख डमरु त्रिशुळ छान वल्कले नेसतो भोळा सांब
बडबड गीत २
जय जय विठोबा रखुमाई विठोबा राजा रखुमाई राणी चंद्र्भागेचे झुळझुळ पाणी उभा विटेवरी हात कटीवरी भजन करीती वारकरी
भोंडला भुलाबाई ७ – आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं पाणी खारोनीआडात होती दिवळीदिवळीत होती सुपारीआमचा हादगा दुपारीआड बाई आडोनीआडाचं पाणी खारोनीआडात होता शिंपलाआमचा हादगा संपला
भोंडला भुलाबाई ६ – सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्यांनी गुफलीतिथं आमच्या वन्सं खेळत होत्यावन्सं वन्सं मला आलं मूळगुणाचे गौरी मला काय पुसतीसपूस जा आपल्या दिराला सोन्याचा चेंडू बाई मोत्याचा दांडूतिथं आमचे भाऊजी खेळत होतेभाऊजी भाऊजी मला…
भोंडला भुलाबाई ५ – बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच आंबात्याचं केलं सुंदर लोणचंते बाई लोणचं मामंजीना वाढलंमामंजीनीं मला शाबासकी दिलीत्याचं मला हासू आलंते बाई हासू तांब्यात भरलंतो बाई तांब्या गंगेला वाहिलागंगेनं मला पाणी दिलंते बाई पाणी…
भोंडला भुलाबाई ४ – नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणीखेळत होत्या गाईच्या गोठ्यातखेळता खेळता झगडा झालाभावजयीवर डाव आलारुसून बसली गाईच्या गोठ्यातसासूरवासी सून रुसून बसली कैसीयादवराया राणी रुसून बसली कैसी सासू गेली समजावयालाचल चल मुली आपुल्या घरालानिम्मा संसार…
भोंडला भुलाबाई ३ – एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचा लिंबाचा…