भोंडला भुलाबाई ११ – आला चेंडू गेला चेंडू

सोशल मिडीयावर शेअर करा

आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारीला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
एवढा डोंगर शोधिला
रामाचा पत्ता कुठं नाही लागला

रामा ग वेचितो कळ्या
सीता ग गुंफिते जाळ्या
आले ग लगीन वेळा
आकाशी घातीला मंडप
जरतारी घातीलं बोहोलं
नवरा नवरी बसली पाटी
पाटी पाटी तिरुबाई राळा
तिरुबाई राळा मुंजक बाळा
मुंजक बाळाची मुंज दोरी
तीच दोरी सावध करी
सावध सावध सर्वत काळ
सर्वत काळाचा उत्तम दोर
दोर बांधा झाडासी
झाड झपका फुल टपका
ते बाई फुल तोडावं
बहिणी माया खोवावं
बहिणी तुझा भांग
मोतीयाचा चांद ग
बहिणी तुझी वेणी ग
मोतीयाची फणी ग
बहिणी तुझे केस ग
मोतीयाचे घोस ग
बहिणी तुझा खोपा ग
चंद्रफुल घेतं झोपा ग

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी

आड बाई आडोनीआडाचं प...

भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग

अवठ बाई कवठ गकवठातु...

भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी

नंदा भावजया दोघीजणी...

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली

सोन्याची सुपली मोत्...

भोंडला भुलाबाई - २२ आपे दूध तापे

आपे दूध तापे त्यावर...

भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा

बाजारातून आणला एकच ...

भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता...

भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई

कारलीचं बी पेर ग सू...

भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा गणेश देव...

भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग

आरडी बाई परडी गपरडी...

भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया

आधी नमुया श्री गणरा...

भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी

आड बाई आडवणीआडाचे प...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content