कारलीचं बी पेर ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा
कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याला पाणी घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला पाणी घातलं हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याला मोड येऊ दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला मोड आला हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याला मांडव घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला मांडव घातला हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याला फूल येऊ दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला फूल आलं हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याला कारलं लागू दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारलं लागलं हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
कारल्याची भाजी कर ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
भाजीचा गंज घास हो सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
भाजीचा गंज घासला हो सासूबाई
आता तरी धाडा ना माहेरा
मला काय पुसतेस पुस जा आपल्या सासर्याला
मामाजी मामाजी आता तरी माहेरी धाडा ना
मला काय पुसतेस पुस जा आपल्या दिराला
भाऊजी भाऊजी आता तरी माहेरी धाडा ना
मला काय पुसतेस पुस जा आपल्या जावेला
जाऊबाई जाऊबाई आता तरी माहेरी धाडा ना
मला काय पुसतेस पुस जा आपल्या नणंदेला
वन्सं वन्सं आता तरी माहेरी धाडा ना
मला काय पुसतेस पुस जा आपल्या नवर्याला
पतिराज पतिराज आता मला माहेरी धाडा ना
घेतली काठी लागली पाठी
जाऊन बसली नदीच्या काठी
हे आपण वाचलेत का?
नदीच्या पल्ल्याड को...
येथून दाणा पेरीत जा...
आड बाई आडवणीआडाचे प...
आड बाई आडोनीआडाचं प...
श्रीकांता कमलाकांता...
अळकीत जाऊ का खि...
एवढसं तांदूळ बाई नख...
एक लिंबु झेलू बाई द...
नंदा भावजया दोघीजणी...
आधी नमुया श्री गणरा...
अक्कण माती चिक्कण म...
काळी चंद्रकळा नेसू ...