नंदा भावजया दोघीजणी
खेळत होत्या गाईच्या गोठ्यात
खेळता खेळता झगडा झाला
भावजयीवर डाव आला
रुसून बसली गाईच्या गोठ्यात
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
सासू गेली समजावयाला
चल चल मुली आपुल्या घराला
निम्मा संसार देते तुजला
निम्मा संसार नक्को मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
सासरा गेला समजावयाला
चल जल मुली आपुल्या घराला
लाल लाल साडी देतो तुजला
लाल लाल साडी नक्को मजला
मी नाही यायची घराला
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
दीर गेला समजावयाला
चला चला वैनी आ्पुल्या घराला
चेंडू लगोरी मी देतो तुम्हाला
चेंडू लगोरी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
जाऊ गेली समजावयाला
चला चला बाई आपुल्या घराला
ताकाचा डेरा देते तुम्हाला
ताकाचा डेरा नक्को मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
नणंद गेली समजावयाला
चला चला वैनी आपुल्या घराला
सोन्याची सुपली देते तुम्हाला
सोन्याची सुपली नक्को मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी
पती गेला समजावयाला
चल चल राणी आपुल्या घराला
लाल लाल चाबूक देतो तुजला
लाल लाल चाबूक नको मजला
मी येते तुमच्या घराला
सासुरवासी सून घरासी आली कैसी
यादवराया राणी घरासी आली कैसी
हे आपण वाचलेत का?
सा बाई सूं सा बाई स...
अळकीत जाऊ का खि...
अक्कण माती चिक्कण म...
कारलीचं बी पेर ग सू...
आरडी बाई परडी गपरडी...
नदीच्या पल्ल्याड को...
आला चेंडू गेला चेंड...
एक लिंबु झेलू बाई द...
आधी नमुया श्री गणरा...
येथून दाणा पेरीत जा...
श्रीकांता कमलाकांता...
या भुलाबाई आमुच्या ...