बडबड गीत २२ – फळांचे गाणे

हे गाणे श्राव्यरुपात (ऑडीओ) ऐकण्यासाठी क्लिक करा

नाशिकची द्राक्षे गोडच गोड
नागपुरच्या संत्र्याची छानदार फोड

वसईच्या केळ्याचा मोठा मान
केळाचे शिकरण लागते छान

मेहरुणची बोरे हिरवी हिरवी गार
लई लई सस्ती पैशाला चार

कलिंगड आहे लालच लाल
खाऊन पहाल तर खुषच व्हाल

पुरेना गप्पा तुम्ही थांबा
फळांचा राजा मी आंबा