बडबड गीत ११ – पोळ्या बाई पोळ्या

पोळ्या बाई पोळ्या

पुरणाच्या पोळ्या

एक पोळी करपली

दुधासंगे ओरपली

दुध लागल कडु

बाळाला आल रडु

बाळ गेला झोपी

त्याला घालु टोपी