बडबड गीत ११
पोळ्या बाई पोळ्या पुरणाच्या पोळ्या एक पोळी करपली दुधासंगे ओरपली दुध लागल कडु बाळाला आल रडु बाळ गेला झोपी त्याला घालु टोपी
बडबड गीत १०
अबई बबई पाण्याला गेल्या घागर फोडूनी घरी आल्या कावळे दादांनी चुंबळी नेल्या काय ग मेल्यांनी गमती केल्या
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासाला बुट्टी मित्रांशी गट्टी शाळेशी कट्टी रोज रोज फिरायला कधी कधी सिनेमाला आणि एकदा गावाला जायच घेऊन दादाला
बडबड गीत ८
आकाशीच्या चंद्रा मला हसायला शिकव गोड गोड हसायला शिकव अरे अरे माश्या मला पोहायला शिकव दूर दूर मला जायला शिकव अरे अरे वार्या मला नाचायला शिकव झिम्मा फुगडी धांगडधिंगा शिकव…
बडबड गीत ७
सहज गेलो गावाला माझ्या कोंबडीला कुणी मारले माझ्या कोंबडीचे पाय जशी दुधावरची साय माझ्या कोंबडीचे पोट जशी विहीरीची मोट माझ्या कोंबडीचे पंख जसे समुद्रातले शंख माझ्या कोंबडीचे गाल जसा खेळायचा…
भोंडला भुलाबाई १२ – अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातुन आला कागद गतो बाई पडला गंगेत गअचकुल मचकुल भाऊ गवडील माझी जाऊ गती बाई वड्या कशा कापितीअचक मचक कशी वाढितीवाढतांना बाई देखिलीसासुबाईंनी ठोकली
भोंडला भुलाबाई ११ – आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंडूराया चेंडू झुगारीलाआपण चाले हत्ती घोडेराम चाले पायीएवढा डोंगर शोधिलारामाचा पत्ता कुठं नाही लागला रामा ग वेचितो कळ्यासीता ग गुंफिते जाळ्याआले ग लगीन वेळाआकाशी घातीला मंडपजरतारी घातीलं…
भोंडला भुलाबाई १० – श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालंअसं कसं वेडं माझ्या कपाळी आलं वेडीयाच्या बायकोनं केल्या होत्या शेवयाआळ्या आळ्या म्हणून त्यानं टाकून दिल्याश्रीकांता कमलाकांता असं कसं झालंअसं कसं वेडं माझ्या कपाळी आलं वेडियाच्या…
भोंडला भुलाबाई ९ – नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड कोण पावना आला ग सई आला गदिर पावना आला ग सई आला गकाय काय घिवून आला ग सई आला गएकसर घिवून आला ग सई आला गएकसर मी लेवायची…
भोंडला भुलाबाई ८ – एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नखानी कोरिलंनखानी कोरीलं वेशीबाहेर नेलंगाय आली हुंगून गेलीम्हैस आली खाऊन गेलीगायीला झाला ग पाडाम्हशीला झाला ग रेडातोच रेडापाडा आमच्या बाप्पाजीचा वाडाबाप्पाजींनी दिली मला जांभळी घोडीजांभळ्या घोड्याची नेटकी…