बडबड गीत १२ – आमची मिनी घुसळते पाणी

आमची मिनी घुसळते पाणी

म्हणते काढीन यातुन लोणी

लोण्याची करीन छान छान भजी

गोष्टी सांगायला येतील आजी

खातील मऊ लोण्याची भजी

म्हणतील गुणाची मिनी माझी